Bhosari : पादचारी तरूणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे 14 ऑगस्ट रोजी घडली.

पांडुरंग बाबुराव पवार (वय 22, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सलमान खाजा काझी (वय 19, शिवाजीवाडी, मोशी) आणि शुभम मारुती हिवरे (वय 19, रा. जयदीप पार्कजवळ, दिघी रोड, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी इंद्रायणीनगर, भोसरी येथील सार्वजनिक रोडवर पवार उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या हातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला. याबाबत भोसरी पोलिसांनी बुधवारी फिर्यादींना फोन करून या गुन्ह्यातील आरोपी इतर गुन्ह्यात अटक असल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.