Pune : चुरशीच्या विजयासह विद्याभवन, एसपीएम उपांत्य फेरीत

सृजन करंडक 2019 बास्केटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – विद्याभवन प्रशाला संघाने संघर्षपूर्ण लढतीत कमलनयन बजाज प्रशाला संघाचा 26-25 असा एका गुणाने पराभव करून सृजन करंडक 2019 आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

डेक्कन जिमखाना कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी विद्याभवन प्रशाला संघाने सुरेख खेळाचे प्रदर्शन करताना आपले वर्चस्व राखले होते. पण, बजाज प्रशाला संघाच्या खेळाडूंनी प्रतिआक्रमण करून त्यांना चोख उत्तर दिले. त्यामुळे मध्यंतराला देखील विद्याभवन प्रशाला संघाला 16-14 अशा दोन गुणांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले होतो. उत्तरार्धातही ही झूंज अशीच कायम राहिली. मात्र, बजाज प्रशाला संघाचे प्रयत्न एका गुणाने अपुरेच पडले. विजयी संघाकडून शिवराज पटेल याने 17 गुण नोंदविले. बजाज प्रशाला संघाकडून जोसुहा डीक्रूझ आणि प्रणव जरांडे यांनी प्रत्येकी १० गुणांची कमाई केली.

दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचत ऋतिर्थ तांदळे (१७ गुण) याच्या जोरदार खेळाच्या जोरावर डीएव्ही प्रशाला संघाने पवार पब्लिक स्कूलचा 38-22 असा पराभव केला. त्यानंतर अभिनव विद्यालयाने शिक्षण प्रसारक मंडळी स्कूलता 34-12 असा पराभव केला. मुलींच्या विभागात एसपीएम प्रशाला संघाने पिछाडी भरून काढताना इन्फंट जीधस प्रशाला संघाचा 35-33 असा पराभव केला. अस्मी व्होरा हिने सर्वाधिक 17 गुण नोंदविले. पराभूत संघाकडून तुलजा पाटील हिने 11 गुण नोदंवून एकाकी लढत दिली. अभिनव विद्यालयाने या गटातूनही उपांत्य फेरी गाठली.
उद्या महाविद्यालयाच्या सामन्यांना सुरुवात होईल.

निकाल – मुले –
विद्याभवन 26 (शिवराज पटेल 17, वेदांत तापकीर 8) वि.वि. कमलनयन बजाज प्रशाला 25 (जोसुहा डिक्रूज 10, प्रणव जरांडे 10) मध्यंतर 16-14
डी.ए.व्ही. 38 (ऋतिर्थ तांदळे 17, कुणाल भोसलो 13) वि.वि. पवार पबिल्क स्कूल 22 (अरमान भाटिया 12, अभिषेक सैनी4) मध्यंतर 14-12
अभिनव विद्यालय ३४ (तनय जोशी ८, आदी जगदाळे ६) वि.वि. एसपीएम १२ (मिहीर जावडेकर ६, मिहीर नवरे ४)
मुली -० एसपीम ३५ (अस्मी व्होरा १७, तिथी भाटे ७) वि.वि. इन्फंट जीझस प्रशाला ३३ (तुलजा पाटील ११ पूर्वा भिरुड ९) मध्यंतर १५-१५
अभिनव विद्यालय 39 (आर्या मटघरे 10, साची पवार 8) वि.वि. विद्यांचल प्रशाला 17 (सिद्धी मुरकुटे 15) मध्यंतर 21-9
सेंट जोसेफ प्रशाला 24 (सिया खिलारे 12, अॅनी रॉय 8) वि.वि. डी.ए.व्ही. 17 (मानसी निर्मळकर 5, रुद्राक्षी मुरकुटे 4) मध्यंतर 14-8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.