Moshi : होर्डिंग दिसत नाही म्हणून केली झाडांची कत्तल, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – होर्डिंग दिसत नाही म्हणून रस्त्याच्या (Moshi) कडेला असलेली तीन झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार मोशी येथील सस्तेवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी साईराज होर्डिंगचे मालक व अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भानुदास तापकीर यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील प्राणिसंग्रहालयाचा कारभार राज्य शासनाच्या हाती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ होर्डिंग यांचे सस्तेवाडी येथे होर्डिग आहे. या होर्डिगच्या समोर झाडे येत होती, त्यामुळे (Moshi) त्यांची जाहिरात दिसत नसल्याने कोणत्याही परवानगी शिवाय त्यांनी एक रेन ट्री, 1 पिंपळ, 1 पेल्ट फोरम अशी तीन झाडे जमिनीपासून 12 ते 15 फुटापर्यंत तोडून टाकली. यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.