BJP : भाजपच्या उपाध्यक्षपदी कुणाल लांडगे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाचे माजी स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे (BJP) यांची पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Moshi : होर्डिंग दिसत नाही म्हणून केली झाडांची कत्तल, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी लांडगे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी अमित गोरखे, नामदेव ढाके, हर्षल ढोरे आदी उपस्थित होते. कुणाल लांडगे यांना घरातून राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील दशरथ लांडगे 1992 ते 1997 या कालावधीत (BJP) महापालिकेचे नगरसेवक होते. कुणाल लांडगे यांनी ‘ह’ प्रभागाचे माजी स्वीकृत सदस्य म्हणून चांगले काम केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जवळचे सहकारी होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.