Pune : पुण्यात वाहनसंख्येत दरवर्षी तीन लाखांची भर

एमपीसी न्यूज – पुण्यात वाहनसंख्येत दरवर्षी 3 लाखांची भर पडत असल्याचे (Pune) प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सांगण्यात आले. पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतीच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन उड्डाणपूल आणि रस्त्यांची उभारणी होत आहे. पण, कोंडी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. कारण शहरातील एकूण वाहनांची संख्या वाढत असून, यंदा नोव्हेंबरअखेर ती 47 लाखांवर पोहोचली आहे. पुण्यात यंदा सुमारे तीन लाख नवीन वाहनांची भर पडली आहे.

यंदा 25 डिसेंबरपर्यंत पुण्यात 2 लाख 90 हजार 793 वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षी ही संख्या 2 लाख 54 हजार 551 होती. यंदा त्यात 36 हजार 242 ने वाढ झाली आहे. यंदा नवीन वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

BJP : भाजपच्या उपाध्यक्षपदी कुणाल लांडगे यांची नियुक्ती

नवीन वाहनांमध्ये 1 लाख 81 हजार 58 दुचाकी, 70 हजार 959 मोटारी, 1 हजार 429 बस, रिक्षा 12 हजार 918, 12 हजार 925 मालमोटारी, प्रवासी टॅक्सी 8 हजार 395, ट्रॅक्टर 1 हजार 940 यांचा समावेश आहे. दरम्यान, मेट्रो सुरू झाल्यावर (Pune) दुचाकींची संख्या घटणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

त्याउलट दिवसेंदिवस दुचाकींची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसत आहे. माणसे कमी आणि वाहने जास्त, अशी पुण्यात परिस्थिती निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.