Talegaon : गॅसचा काळा बाजार केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – कोणताही परवाना नसताना घरगुती (Talegaon) गॅसमधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये पाईपने गॅस भरणाऱ्याला तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.28) वराळे येथील एच.पी.कंपनी समोर सुरु होता.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील प्राणिसंग्रहालयाचा कारभार राज्य शासनाच्या हाती

नरेंद्र निवृत्त बागवडे (वय 43 रा.तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. यावरून पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नंदिनी गॅस सर्व्हीस या दुकानात भरलेले गॅस सिलेंडर मधून रिफील पाईपद्वारे घरगुती गॅस अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता भरलेल्य गॅस काढून घेत होता. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.