Moshi : वेश्याव्यवसाय प्रकरणी मोशी येथील स्पा सेंटरवर छापा; एका महिलेला अटक

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Moshi) केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एका महिलेला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी(दि.29) रात्री मोशी येथील स्पाईन रोड येथे करण्यात आली.

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अटक महिला आरोपी व निखिल गजानन चौधरी (वय 32, रा. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कशाला स्पाईन रोड येथे स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची (Moshi) माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून तेथील पीडित महिलांची सुटका केली व महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे.

BJP : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.