Mruggad News : मृग गडावरून पर्यटक पडून जखमी; शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेने बचावले प्राण

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात (Mruggad News) असलेल्या मृगगडावरून एक पर्यटक तरुण पडला. ही घटना रविवारी (दि. 30) घडली.

पर्यटक तरुण त्याच्या सहकाऱ्यांसोबत सुधागड तालुक्यातील मृग गडावर फिरण्यासाठी गेला. तिथे तो गडावरून घसरून पडला. त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी बचाव पथकांना संपर्क केला असता शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या सदस्यांनी गडाकडे धाव घेतली.

Moshi : वेश्याव्यवसाय प्रकरणी मोशी येथील स्पा सेंटरवर छापा; एका महिलेला अटक

योगेश उंबरे, राजेंद्र कडु, महेश मसने, योगेश दळवी, सागर कुंभार, प्रविण देशमुख आणि सुनिल गायकवाड हे पथक मृग गडावर पोहोचले. जखमी तरुणाला चालता येत नसल्याने त्याला रेस्क्यू स्ट्रेचरच्या सहाय्याने खाली आणण्यात आले. गडावरील तीव्र उतारामुळे जखमी तरुणाला खाली आणत असताना पथकाला अनेक अडथळे आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.