Bhosari : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज – तडीपार गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari) शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजता फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली.

चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : राज्यातील मधमाशा पालकांसाठी ‘मधुमित्र पुरस्कार’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुतार याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 5 ऑगस्ट 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. (Bhosari) त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात बेकायदेशीरपणे आला. त्याने त्याच्याकडे तलवार बाळगली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला तलवारीसह अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.