Talegaon Dabhade : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – दहावी, बारावी नंतर कोणकोणत्या शिक्षणाच्या (Talegaon Dabhade) संधी असतात, याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी ‘चला करिअर घडवूया’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवारी (दि. 6) सकाळी साडेदहा वाजता मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृह,स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव दाभाडे येथे हा कार्यक्रम होणार आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये असे मार्गदर्शन मेळावे होत असतात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक संभ्रम स्थितीत असतात.अशावेळी योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन या सुवर्णसंधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तिन्ही संस्थांचे मार्गदर्शक श्री.संतोष खांडगे व रोटरी क्लबचे अध्यक्ष रो विन्सेंट सालेर यांनी केले आहे.

Pune : राज्यातील मधमाशा पालकांसाठी ‘मधुमित्र पुरस्कार’

पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आजच्या काळात करिअरच्या अनेक नव्या संधी ओळखून प्रा. विजय नवले हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतात. ते करिअर सेवा डॉटकॉम करिअर कॅलेंडरचे लेखक आहे.मावळ (Talegaon Dabhade) तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन तिन्ही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर (दूरध्वनी 9975707538)यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संतोष खांडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.