१४ मे : दिनविशेष

१४ मे – महत्वाच्या घटना

  • १७९६: इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • १९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.
  • १९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
  • १९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
  • १९६५ चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
  • १९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

१४ मे – जन्म

  • १६५७: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १६८९)
  • १९०७: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९७४)
  • १९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)
  • १९२३: दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म.
  • १९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)
  • १९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.
  • १९९०: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म.
  • १९९८: रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे २०१२)

१४ मे – मृत्यू

  • १६४३: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)
  • १९२३: कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८५५ – होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)
  • १९६३: भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: ३० डिसेंबर १९०२)
  • १९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१७)
  • १९९८: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९१५)
  • २०१२: रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन. (जन्म: १४ मे १९९८)
  • २०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९३९)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.