१३ मे : दिनविशेष

१३ मे – महत्वाच्या घटना

  • १८८०: थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
  • १९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
  • १९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.
  • १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
  • १९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न.
  • १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
  • १९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • १९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
  • १९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
  • १९९६: लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
  • १९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.
  • २०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
  • २०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

१३ मे – जन्म

  • १८५७: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२ – लंडन, यू. के.)
  • १९०५: भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)
  • १९१६: भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म.
  • १९१८: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८४)
  • १९२५: दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००४)
  • १९५१: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म.
  • १९५६: आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्म.
  • १९५६: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.
  • १९७३: गीतलेखक, कवी संदीप खरे यांचा जन्म.
  • १९८४: भारतीय गायक बेनी दयाल यांचा जन्म.

१३ मे – मृत्यू

  • १६२६: अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.
  • १९०३: फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८६४)
  • १९०४: प्रसिद्ध उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, देशभक्त जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन.
  • १९५०: प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)
  • २००१: लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)
  • २०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)
  • २०१३: भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.