१८ ऑक्टोबर : दिनविशेष

What Happened on October 18, What happened on this day in history, October 18. See what historical events occurred, which famous people were born and who died on October 18.

१८ ऑक्टोबर : दिनविशेष– जागतिक रजोनिवृत्ती दिन

१८ ऑक्टोबर – महत्वाच्या घटना

  • १८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

    १८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.

    १९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.

    १९१९: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला.

    १९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.

    १९५४: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.

    १९६७: सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

    १९७७: २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.

    २००२: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.

१८ ऑक्टोबर– जन्म

  • १८०४: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १८६८)

    १८६१: न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९३८)

    १९२५: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहिम अल्काझी यांचा जन्म.

    १९२५: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर २०११)

    १९३९: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

    १९५०: अभिनेता ओम पुरी यांचा जन्म.

    १९५६: झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा यांचा जन्म.

    १९६५: इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक यांचा जन्म.

    १९७४: भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म.

    १९७७: भारतीय अभिनेता कुणाल कपूर यांचा जन्म.

    १९८४: भारतीय अभिनेत्री फ्रीडा पिंटो यांचा जन्म.

१८ ऑक्टोबर– मृत्यू

  • १८७१: पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १७९१)

    १९०९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १८४९ – कलकत्ता)

    १९३१: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८४७)

    १९५१: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८५)

    १९७६: भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८९५)

    १९८३: क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९३१)

    १९८७: कम्युनिस्ट कार्यकर्ते वसंतराव तुळपुळे यांचे निधन.

    १९९३: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन.

    १९९५: छायालेखक ई. महमद यांचे निधन.

    २००४: चंदन तस्कर वीरप्पन यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९५२)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.