१९ऑक्टोबर : दिनविशेष

What Happened on October 19, What happened on this day in history, October 19. See what historical events occurred, which famous people were born and who died on October 19.

१९ ऑक्टोबर : दिनविशेष

१९ ऑक्टोबर – महत्वाच्या घटना

  • १२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.

    १८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

    १९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.

    १९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

    १९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

    १९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.

    १९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.

    १९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

    २०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

    २००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

१९ ऑक्टोबर– जन्म

  • १९०२: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

    १९१०: तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)

    १९२०: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

    १९२५: वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००१)

    १९३६: गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००९)

    १९५४: रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)

    १९६१: अभिनेते अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांचा जन्म.

१९ ऑक्टोबर– मृत्यू

  • १२१६: इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६)

    १९३४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)

    १९३७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)

    १९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)

    १९५०: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८८७)

    १९९५ बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन.

    २००३: बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)

    २०११: भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९३५)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.