स्त्री भ्रूण हत्या निंदनीय – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – देशभरात महिला दिन विविध उपक्रम हाती घेऊन राबविला जातो. मात्र, दुस-या बाजूला महिलावर अन्याय अत्याचार होतात. हे योग्य नसून राज्यात आज ही स्त्री भ्रूण हत्या होत आहे. ही निंदनीय बाब आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिन देशभरात विविध उपक्रम हाती घेऊन अनेक संघटना साजरा करतात. पुणे देखील यात मागे नसून नेहमीप्रमाणे या शहराने वेगळेपणा जपला आहे. त्याविषयी सांगायचे झाल्यास आज पुण्यात दर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या माध्यमातून वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले जाते. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी एकत्रित येतात आणि मसाला डोसा, इडली सांबर, चहा घेत मनमोकळया गप्पा मारल्या जातात. आज देखील अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, आज त्यात वेगळापणा होता.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खासदार सुप्रिया सुळे, नगरसेविका मुक्ता टिळक, उपजिल्हाधिकारी सुप्रिया दातार, पुणे महापालिका लेखापाल उल्का कळसकर, वाहतूक पोलीस कल्पना बारवकर या विविध क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या. आपण कोणत्या पदावर आहोत, हे विसरून गप्पा मारल्या. तर या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी मुलाखती घेत सर्व महिलांना बोलते केले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिला दिन एका दिवसा पुरता साजरा न करता 365 दिवस साजरा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरातील स्त्रियांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी सुप्रिया दातार म्हणाल्या की, 21 व्या युगात देखील महिलांना स्वत सिद्ध करावे लागत आहे, अशी खंत व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक महिलेने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे.

यावेळी नगरसेविका मुक्ता टिळक म्हणाल्या की, राजकीय जीवनात काम करताना अनेक अनुभव येतात. त्यामध्ये प्रामुख्याने घर आणि समाजतील प्रश्न सोडविताना कसरत करावे लागत आहे. येत्या काळात समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणार असून प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुढे येऊन काम करण्याची गरज आहे.

महापालिका लेखापाल उल्का कळसकर म्हणाल्या की, घरातील हिशेब मांडताना कसरत करावी लागते. तसेच महापलिकेत लेखापाल म्हणून करताना करावी लागते. त्यापुढे म्हणाल्या की, प्रशाकीय सेवेत महिला मोठ्या प्रमाणावर काम करतात ही चांगली गोष्ट आहे. या पुढील काळात देखील महिलांनी प्रशासकीय सेवेत येणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.