टोळ्याक्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टोळक्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास माणगाव, मुळशी येथे घडली. 


कृष्णा रामाधार सिंह (वय 60) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी समाधान कुंडलिक भालेराव (वय 23, रा. गराडे वस्ती, माणगाव), नितीन बाळासाहेब कुटे (रा. चांदे, माणगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रातदयाल भोला राय (वय 26, रा. इन्फोटेक पार्क, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंह हे माणगाव येथे कामाला होता. धुलीवंदन दिवशी गाणी बंद करण्यावरुन आरोपींची आणि त्यांची बाचाबाची झाली होती. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी कृष्णा यांना बेदम मारहाण केली होती.
 

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कृष्णा यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि.15) त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.