दिघीत थकबाकीची नोटीस देण्यास गेलेल्या अभियंता महिलेला शिवीगाळ

एमपीसी न्यूज – थकबाकीसाठी काढण्यात आलेली नोटीस देण्यासाठी गेलेल्या कनिष्ठ अभियंता महिलेला एकाने शिवीगाळ केली. तसेच नोटीस घेऊन फाडून टाकली. ही घटना बुधवारी (दि.15) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आळंदी येथील तापकीरमळा येथे घडली. 

 
याप्रकरणी अशोक पंढरीनाथ माधिरे (रा. तापकीरमळा, आळंदी) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साधना शिंदे (वय 26, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 
साधना शिंदे या आळंदी नगरपरिषदेत कनिष्ठ अभियंता आहे. तर, माधिरे यांची तापकीरमळा येथे तीन मजली इमारत आहे. त्याच्यांकडे मालमत्ता कर थकलेला आहे. साधना शिंदे या कर्मचा-यांसह बुधवारी थकबाकीसाठी काढण्यात आलेली नोटीस माधिरे यांना देण्यासाठी गेल्या होत्या. 

 

त्यावेळी माधिरे यांनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच कर्मचारी मल्हारी बोरगे यांना धक्का-बुक्की केली. माधिरे यांनी नोटीस स्विकारली आणि त्यांच्यासमोर फाडून टाकल्याचे, पोलिसांनी सांगितले. दिघी ठाण्याचे फौजदार आर.व्ही. घाटगे तपास करत आहेत.
 
"dipex"
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.