गड-किल्ल्यांचे संवर्धन करुया,व्यसनाधिनतेपासून दूर राहूया

शिवजयंतीनिमित्त तरुणाईने केले प्रबोधन ;अखिल फर्ग्युसन रोड शिवजयंती उत्सव

एमपीसी न्यूज – जपुया वारसा इतिहासाचा… व्यसनाधिनतेपासून दूर राहूया… गड-किल्ले हाच खरा शिवरायांचा इतिहास… गडसंवर्धनातून करु छत्रपतींना मानाचा मुजरा अशा घोषणा देत तरुणाईने अनोख्या पद्धतीने शिवजयंतीनिमित्ताने जनजागृती केली. गड-किल्ले संवर्धनासोबतच स्त्री भ्रूण हत्या, बेरोजगारी, बालगुन्हेगारी, व्यसनाधिनता, स्वच्छ पुणे सुंदर पुणे याविषयी सजग आवाहन करणा-या पारंपरिक वेशातील तरुणाई सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

संत तुकाराम पादुका चौकातील अखिल फर्ग्युसन रोड शिवजयंती उत्सव तर्फे शिवजयंती सोहळा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध विषयांसंदर्भात प्रबोधन करण्यात आले. यावेळी भा.ज.पा. संघटनमंत्री रवि अनासपुरे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, संस्थेचे अध्यक्ष अमित थोरात, प्रसाद वाढवणे, रवि लोहिया, चंदन इंगुले, तेजस देशमुख, ओंकार हाटकर, ओंकार मालुसरे, मधुसुदन लोहिया, मंदार तापकीर, दिपक निकम, समीर खरे आदी उपस्थित होते.  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली. मिरवणुकीचे 10 वर्ष होते.

डॉ.अजय दुधाणे म्हणाले, गड-किल्यांच्या संवर्धनासोबतच तेथील पावित्र्य ही देखील महत्त्वाची बाब आहे. अनेक गड-किल्ल्यांवर दारु, सिगारेट यांसारखी व्यसने केली जातात. यामुळे किल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचविण्याकरीता व्यसनमुक्तीविषयी जनजागृती होणे देखील गरजेचे आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.  
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.