कोंढवा आणि भोसरीतील वेश्या व्यवसाय रॅकेट उध्वस्त; चार अल्पवयीन मुलींसह सहाजणींची सुटका

एमपीसी न्यूज – सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे शहरातील कोंढवा आणि भोसरीत वेश्या व्यवसाय चालवणारे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करून घेणा-या दोन महिलांना अटक केली आहे. तर अन्य एक महिला पसार झाली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. ही कारवाई काल (16 मार्च) करण्यात आली.

याप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही महिलांविरोधात फरासखाना आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर अन्य एक महिला पसार झाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक तुषार आल्हाट व प्रदीप शेलार यांना वरील महिला येथील व परराज्यातील अल्पवयीन मुलींना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे कर्मचारी व फरासखाना आणि भोसरी पोलिसांनी संयुक्तपणे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापा टाकून कोंढवा येथून चार अल्पवयीन मुलींची तर भोसरीतील शिवशंकर कॉलनी येथून दोन सज्ञान मुलींची सुटका केली.

 

 

ही करवाई पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहपोलीस आयुक्त सुरेश भोसले, अरूण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सह पोलीस निरीक्षक संपत पवार, शीतल भालेकर, तुषार आल्हाट, नितीन तेलंगे, प्रमोद म्हेत्रे, अविनाश मराठे, रमेश लोहकरे, संजय गिरमे, प्रदीप शेलार, नितीन तरटे, राजेश उंबरे, संदीप गायकवाड, सचिन शिंदे, ढोले आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.