एफटीआयआयला भेट देण्याची पुणेकरांना संधी; 18 व 19 मार्चला ओपन डे

एमपीसी न्यूज – फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) तर्फे उद्या शनिवारी तसेच रविवारी (दि. 18 व 19) ओपन डे ठेवण्यात आला असून त्या अंतर्गत पुणेकरांना एफटीआयआयला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

यामध्ये एफटीआयआयचे कॅम्पस, विविध विभाग, स्टुडिओ आणि इतर अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. यासाठी एफटीआयआयच्या www.ftiiindia.com या संकेतस्थळावर अथवा एफटीआयआयच्या मुख्यद्वारात दि. 17 व 18 मार्चला  11 ते 5 या वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. एफटीआयआयमध्ये सकाळी 10 ते 10.30, 11.30 ते 12, दुपारी 2.00 ते 2.30, 3.00 ते 3.30, 4.00 के 4.30 यावेळेत प्रवेश चालू राहील.

यापैकी 18 मार्चला फक्त शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना प्रवेश दिला जाईल. तर 19 मार्चला सर्वसामान्य नागरिकांसाठी ओपन डे असणार आहे.

जास्तीत जास्त पुणेकरांनी या संधीचा फायदा घेऊन एफटीआयआयला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.