परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तळेगावच्या इसमाला लाखोंचा गंडा


एमपीसी न्यूज- विदेशात नोकरी  मिळवून देण्याचे आमिष दाखवून  एका अभियंत्याला  लाखोंचा गंडा घातल्याची घटना सोमवारी तळेगाव येथे उघडकीस  आली.

या संदर्भात   विलास नामदेव नितनवरे (वय ४१, रा. शिंदेवस्ती – रावेत, ता. हवेली.) यांनी तळेगाव  एमआयडीसी पोलीस ठाण्यात  फसवणूक झाल्याची  फिर्याद  दिली  आहे.


पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास नितनवरे यांना 4 मे ते 2017 ते 17जुलै 2017 या कालावधीत इम्प्रेस ऑटोमिशन कंपनी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे पदांची भरती सुरु असून तुम्ही इच्छुक असाल तर तुमचा बायोडाटा व इतर सविस्तर माहिती मेलवरपाठवण्यास  सांगितले. त्याप्रमाणे नितनवरे यांनी  माहिती  पाठवली. त्यानंतर त्यांची सहाय्यक व्यवस्थापक पदावर नियुक्ती झाल्याचा मेल त्यांना पाठविण्यात आला. अग्रीमेंट करून पुन्हा सविस्तर माहिती पाठविण्यासाठी सांगितले.

आरोपी अॅन्ड्र्यू (पूर्ण नाव व  पत्ता माहित नाही) यांनी विलास  नितनवरे यांना  वेळोवेळी  नोकरीला जाण्याचा फोन करून पैसे उकळले. भामट्याने  त्यांच्याकडून ऑनलाईन  एकूण सहा  लाख ५९  हजार १०० रुपये उकळले. आपली  फसवणूक  झाल्याचे  लक्षात  येताच  नितनवरे यांनी अखेरीस सोमवारी  फसवणूक झाल्याचा गुन्हा  पोलीस ठाण्यात दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.