Pune : फुटपाथवरील 65 वर्षीय निराधार ज्येष्ठाला मातृसेवा वृद्धाश्रमाचा आधार

एमपीसी न्यूज – थकलेली शरीरयष्टी, आधाराशिवाय हालचाल नाही अशा अवस्थेत एक 65 वर्षीय आजोबा पुण्यातील (Pune) मित्र मंडळ चौकात उन पावसात केवळ भिंतीचा आधार घेऊन दिवस काढत होते. या ज्येष्ठाला मातृसेवा वृद्धाश्रमाचे चेअरमन सुहास गोडसे यांनी आधार देत डोक्यावर छत अन पोटाला अन्न दिले.

Pimpri : विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या महिलेचा मृत्यू

पुण्यात मित्रमंडळ चौकात स्वाती भंडारे यांचे सिम्पली आर्ट गॅलरी नावाचे दुकान आहे. त्याना रोज दुकानात आले असता फुटपाथवर हे आजोबा दिसत होते. त्यांना उठता बसता येत नसल्याने त्यांचे हाल त्या पहात होत्या. त्यांना सहन झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतःहून आजोबांची विचारपूस केली.

तेंव्हा ते भिकारी वाटले नाहीत. भंडारे यांनी त्यांच्या परीने अन्न, स्वच्छता, कपडे आजोबांना पुरवले. पण त्यांची गरज तेवढीच नव्हती त्यांना कायमस्वरुपी आधार हवा होता. त्यांना डोक्यावर छत अन मदतीला माणूस हव होते. भंडारे यांनी सोशल मिडीया, मित्रपरिवार येथे चांगल्या वृद्धाश्रमाचा शोध सुरु कोला. तेंव्हा त्यांना औंध येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेची माहिती मिळाली. जे वृद्ध, अंध व असाह्यव्यक्तींसाठी काम करते.

भंडारे यांनी मातृसेवा संस्थेचे श्रीलक्ष्मी व चेअरमन सुहास गोडसे यांना त्वरीत संपर्क साधला. यावेळी गोडसे यांनी योग्य ती कखात्री करून घेत अवघ्या आट ते नऊ दिवसात आजोबांना मातृसेवा सेवाभावी संस्थेत दाखल करून घेतले. तेथे त्यांना स्वच्छ कपडे, अन्न, तसेच इतर कामाना देखील मादत केली जात आहे. त्यामुळे आजोबा देखील खून आहेत.ते मागील 5 वर्षापासून पुण्यात असे फुटपाथवर त्यांचे जिवन जगत होते. मात्र मातृसेवेमुळे त्यांना एक सुरक्षीत निवास मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.