Mizoram Bridge Collapse : मिझोराममध्ये मोठी दुर्घटना; रेल्वे ब्रिज कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर गाडले गेल्याची शक्यता

एमपीसी न्यूज : मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ (Mizoram Bridge Collapse) निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील मालदाचे जिल्हा दंडाधिकारी नितीन सिंघानिया यांनी सांगितले की, मिझोरममध्ये झालेल्या अपघातात मालदा येथील 13 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो. मृतदेह परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी नमूद केले.

Pimpri : विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या महिलेचा मृत्यू

मिझोरामच्या रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्पावर हे मजूर काम करत होते. पुल क्रमांक 196 ची उंची 104 मीटर आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा 42 मीटर उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे.

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी अपघातावर तसेच (Mizoram Bridge Collapse) शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत त्यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी कामना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.