Pimpri : विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पिंपरी पोलिसांनी तपास सुरु केला. त्यात ती महिला बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्यासह तिला बनावट कागदपत्रे काढून देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

Chakan : तरुणीचे अपहरण करून विनयभंग

मुकेश बक्षोमल केसवानी (वय 41, रा. रिव्हर रोड, पिंपरी), कृष्ण प्रकाश नायर (वय 38, रा. चऱ्होली बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मूळ वास्तव्य उझबेकिस्तान येथील असणाऱ्या 39 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथील एका हॉटेल रेसिडेन्सी मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा तपास करत असताना ती महिला मूळची उझबेकिस्तान येथील असून ती बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याचे समोर आले.

तिला भारतात राहण्यासाठी आरोपी मुकेश आणि कृष्णा यांनी बनावट आधारकार्ड आणि पन कार्ड बनवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी (Pimpri) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.