Chakan : तरुणीचे अपहरण करून विनयभंग

एमपीसी न्यूज – एका तरुणीचे रिक्षा चालकाच्या मदतीने अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिला हाताने मारहाणही केली. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चाकण (Chakan) जवळील मेदनकरवाडी येथे घडली.

Pune : कांदा निर्यात शुल्क विरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

संदीप सायस आरगडे (रा. गवळी नगर, भोसरी) आणि महादेव उर्फ महाद्या दशरथ पाचांगे (रा. बनकर वस्ती, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पाचांगे याला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 22) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप आणि महादेव यांनी आपसात संगनमत करून आरोपी महादेव याच्या रिक्षातून फिर्यादी तरुणीचा पाठलाग केला. तिला जबरदस्तीने रिक्षात बसवून अपहरण केले. भोसे गावाच्या हद्दीत नेऊन फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

आरोपी संदीप याने फिर्यादी तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र तरुणीने त्याला नकार दिला असता आरोपीने पुन्हा तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.