Thergaon : वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन महिलांना पैशांचे आमिष (Thergaon) दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे करण्यात आली.

याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mizoram Bridge Collapse : मिझोराममध्ये मोठी दुर्घटना; रेल्वे ब्रिज कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवले. पैशांच्या आमिषाने त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून आलेल्या पैशांवर आरोपी महिलेने स्वतःची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.