Chakan : रिक्षा-दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – रिक्षाने अचानक वळण घेतल्याने (Chakan) रिक्षाला दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री आठ वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर रासेफाटा येथे घडली.

ऋषिकेश रवींद्र पवार (वय 20, रा. कान्हेफाटा, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अश्विन दत्ता धामणकर (वय 23, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ), तुषार रमेश पवार हे दोघेजण जखमी झाले आहेत.

अश्विन यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालक सौरभ शंकर मुंगसे (वय 22, रा. रासे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Thergaon : वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विन आणि (Chakan) त्यांचे दोन मित्र तुषार व ऋषिकेश हे ट्रिपलसीट चाकण-शिक्रापूर रोड ने जात होते. त्यावेळी शिक्रापूर-चाकण रोडने आरोपी सौरभ त्याच्या ताब्यातील रिक्षा घेऊन जात होता.

रासेफाटा येथे सौरभ याने अचानक रिक्षा वळवल्याने फिर्यादी यांच्या दुचाकीची रिक्षाला धडक बसली. त्यात ऋषिकेश हे गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर अश्विन आणि तुषार हे गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.