Hinjawadi : हिंजवडीमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील विनोदे कॉर्नर (Hinjawadi) येथे एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि. 21) रात्री दहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

झाकीर सलायत मल्लीके (वय 33, रा. भूमकर नगर, वाकड), हार्दिक विजय वाघुले (वय 30, रा. लोणी काळभोर), रविकिरण शेजराव केदार (वय 27, रा. भूमकर नगर, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण नरळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan : रिक्षा-दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हॉटेल बी 5 रुफटॉप लॉज येथे ग्राहकांना पिण्यासाठी हुक्का उपलब्ध करून दिला. हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती हिंजवडी (Hinjawadi) पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी 15 हजार 900 रुपयांचा तंबाखूजन्य हुक्का आणि साहित्य जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.