Sangvi : जुन्या भांडणाच्या रागातून कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून एका कारची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. 28) पहाटे जुनी सांगवी येथे पोस्ट ऑफिसजवळ उघडकीस आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी आणि फिर्यादी समोरासमोर राहण्यास आहेत. फिर्यादी उपचारासाठी गेले आहेत. उपचार घेतल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहेत. एका वॅगन आर कारची पुढची काच फुटली आहे. जुन्या भांडणातून हा प्रकार झाला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.