Dapodi Crime News: अतिक्रमणाची तक्रार केली म्हणून लोखंडी रॉडने मारहाण
एमपीसी न्यूज – गुरांचा गोठा मोठा करून अतिक्रमण केल्याची तक्रार केली म्हणून गोठा मालकाने बांधकाम व्यावसायीकाला लोखंडी रॉडने मारहाण (Dapodi Crime News)केली आहे.ही घटना गुरुवारी (दि.19) सकाळी दापोडी येथे घडली आहे.
किशोर वसंत काटे (वय 40 रा.दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ऋषिकेश इंद्रभान साखरे (रा.दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Moshi News : भाड्याचे पैसे थकवून घर मालकीणीलाच केली मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचा गुरांचा गोठा मोठा करून तो रस्त्यावर अतिक्रमण केले होते. याविरोधात फिर्यादी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अतिक्रमणाची तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले होते. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Dapodi Crime News )आहेत.