Moshi News : भाड्याचे पैसे थकवून घर मालकीणीलाच केली मारहाण

एमपीसी न्यूज –  राहत्या घराचे 6 लाख रुपये घरभाडे (Moshi News) थकवून घराचा कब्जा घेण्यासाठी गेलेल्या घर मालकीणीला भाडेकरुंनी मारहाण केली आहे. हा प्रकार मोशी बोऱ्हाडेवाडी येथे गुरुवारी (दि.19) दुपारी घडला आहे.

याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ओमप्रकाश देवगडकर (वय 50) व महिला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांची 70 वर्षीय सासू व नणंद या आरोपी रहात असलेल्या घरात बॅग घेऊन राहण्साठी गेल्या असता आरोपीने त्यांना धक्काबुक्की केली. (Moshi News) तसेच 50 हजार द्या तेंव्हाच घरात येवू देऊ अशी धमकी दिली. फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी व नणंदेशी गैरवर्तन केले. आरोपी यांने फिर्यादींचे 6 वर्षापासून 6 लाखरुपये भाडे थकवले आहे. तसेच फिर्यादीच्या घरावर अतिक्रमण केले आहे. यावरून एमआयीडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.