Dapodi : फटाके फोडण्यावरून दोन कुटंबात वाद, पती-पत्नीला व मुलींना मारहाण

एमपीसी न्यूज – फटाके फोडल्यावरून झालेल्या (Dapodi) वादातून दोन कुटंबियांमध्ये भाडण झाले. ज्यामध्ये पती-पत्नी व दोन मुलींना मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकऱणी भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार बुधवारी (दि.29) दापोडी येथील वीटभट्टी येथे घडला आहे.

या प्रकरणी हरीसिंग लच्छी पांचाळ (वय 42 रा, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय शिंदे, महिला आरोपी, आनंद गायकवाड, अशोक साळवी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात फटाके फोडण्यावरून भांडण झाले होते. याचाच राग येवून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुली मध्ये आल्या असता आरोपीने मुलींच्या डोक्यात ही वीट घालत त्यांना जखमी केले.

Pune : घोरपडी येथे वापरात नसलेल्या रेल्वे कोचमध्ये ‘कोच कॅन्टीन’चे उद्घाटन

यावेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Dapodi) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.