Pune :सोन्याच्या दरात 480 रुपयांनी वाढ
एमपीसी न्यूज़- आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा ( Pune) भाव 10 ग्रॅम ला ₹61,230 एवढा असून काल 10 ग्रॅमला ₹60,750 होता. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात ₹ 480 एवढी वाढ झाली आहे.
तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम ला ₹56,520 एवढा असून काल 10 ग्रॅमला ₹ 56,140 एवढा होता. आज ₹380 एवढी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चांदीचा भाव आज 1 किलो ला ₹73,000 एवढा असून भावात काही फरक पडला नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या घडामोडींमुळे सोन्याचा भाव हा वाढला आहे, तसेच अजूनही ( Pune) वाढण्याची शक्यता दर्शविली जात आहे.