Pune Mahavitran : घाना देशाच्या वरिष्ठ विद्युत अधिकाऱ्यांची पुणे  महावितरण विभागाला भेट

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिसिटी कंपनी ऑफ घाना लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय ( Pune Mahavitran) अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 26) महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयास भेट दिली. यावेळी तांत्रिक प्रगती तसेच ग्राहकाभिमुख योजनांची त्यांनी माहिती घेतली. सोबतच महावितरणकडून प्रामुख्याने तांत्रिक, लेखा व मानव संसाधन विभागाशी संबंधित प्रशिक्षणाच्या सहकार्याची अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

पश्चिम अफ्रिकातील घाना देशाच्या विद्युत कंपनीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सोलोमन मेन्साह (प्रशिक्षण व व विकास), इबेनेजेर घुनन्ये (संचालन) आणि इब्राहिम याकुबु (देखभाल) यांच्या शिष्टमंडळाने आज महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयास भेट दिली. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एओटीएस अल्यूमनी सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष अतुल ठाकर, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत, एओटीएस अल्यूमनी सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाचे शुकलेंदू सोमण, मिलिंद जोशी, सुधांशू काशिकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री धनराज बिक्कड, संजय वाघमारे, धनंजय आहेर, अमित कुलकर्णी, भागवत थेटे, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर आदी उपस्थित होते.

घाना देशाच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या ‘स्काडा’ सेंटर, मीटर टेस्टींग लॅब, प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर ‘प्रकाशदूत’ सभागृहात झालेल्या वार्तालापात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वीजक्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी महावितरणची ग्राहकसेवा आणि तांत्रिक प्रगतीची माहिती दिली. तसेच वीज वितरण यंत्रणेच्या विविध मुद्द्यांवर संवाद साधला. या शिष्टमंडळाने महावितरणच्या सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम, फोटो मीटर रीडिंग व मीटर रीडिंग अॅप, ग्राहकांसाठी मोबाईल अॅप, घरगुती व कृषी ग्राहकांसाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची विशेष ( Pune Mahavitran) कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.