Alandi : पालिकेच्या लगतच्या रस्त्यावरच भाजी विक्रेते बसल्याने रहदारीस अडथळा

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषद जवळील भाजी पाला विक्रेत्यांची रांग ( Alandi ) काल  (दि.26) आळंदी नगरपरिषद इमारती पर्यंत दिसून येत होती. हे भाजी विक्रेते तेथील रस्त्यावर दुतर्फा भाजी पाला घेऊन विक्री करताना दिसून येत होते. तसेच काही भाजी विक्रेत्यांच्या दुकानांच्या समोर रस्त्यावरच भाजी पाला विक्रीसाठी ठेवल्याने काल ( दि.26 रोजी) संध्याकाळी रहदारीस समस्या उदभवत होती.

नगर परिषदेजवळच  शाळा आहे. सायंकाळी ती शाळा सुटल्यावर मुलांना व त्यांच्या पालकांना गर्दीचा  त्रास सहन करावा लागत आहे.अशी माहिती आळंदीतील स्थानिक नागरिक अजित भणगे यांनी दिली. याबाबत योग्य ती उपाय योजना व्हावी.असे यावेळी त्यांनी ( Alandi ) सांगितले.
काल रात्रीच विभाग प्रमुख यांना सांगितले आहे.विभाग प्रमुख आज कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचना देतील.एक दोन दिवसात बदल होईल.भाजी विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने जागेची अडचण निर्माण होत आहे,असे यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.