Babanrao Dhakane : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते  87 वर्षांचे ( Babanrao Dhakane ) होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर  येथील साईदीप रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Pimpri : ठेकेदारांनी सुरक्षेची साधने न पुरवल्याने नागरिक व कामगारांची सुरक्षा रामभरोसे, महापालिकेचा ही कानाडोळा

बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते.

याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. 1994 मध्ये ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रीही ( Babanrao Dhakane ) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.