Pimpri : ठेकेदारांनी सुरक्षेची साधने न पुरवल्याने नागरिक व कामगारांची सुरक्षा रामभरोसे, महापालिकेचा ही कानाडोळा

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ( Pimpri ) विकास कामे सुरु आहेत. संबंधीत कामासाठी ठेकेदार विविध कंपन्या महापालिकेने नेमल्या आहेत. यासाठी विविध अटी मान्य करत ठेकेदरांनी निवीदा देखील भरल्या आहेत. मात्र सर्वात महत्वाची कामगारांच्या सुरक्षेची अट ठेकेदार जणू विसरले आहेत. कारण शहरात ठिकठिकाणी कामगार कोणत्याही सुरक्षा साधनाशिवाय काम करताना दिसत आहेत.

याबाबत नागरिक शिवानंद चौगुले यांनी सोशल मिडीयावर याबाबत वाचा फोडली असून त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,  संभाजीनगर – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. परंतु महापालिकेकडील बहुतांश ठेकेदार त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने पुरवत नाहीत.

Thergaon : महापालिकेच्या वतीने थेरगावमध्ये कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे नियोजन

त्यामुळे ठेकेदारांकडे काम करणारे बहुतांश कामगार जिवावर उदार होऊन सुरक्षासाधनांशिवाय कामे करत आहेत. परंतु लाखो रुपयांचे टेंडर भरून काम मिळविणारे ठेकेदार मात्र कामगारांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करत असताना महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कामगाराला अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित ( Pimpri ) होत आहे.

संभाजीनगर, चिंचवड प्रवेश द्वाराजवळ  वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर रोटरी क्लब, ठाणे जनता बँक आणि वेदांत हॉस्पिटल सारखे व्यावसायिक इमारती असल्यामुळे जड वाहने तसेच सार्वजनिक वाहनांची सारखी वर्दळ असते. त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती कामे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून करून घेतली जातात. मात्र कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे, कामगारांना सुरक्षा साहित्ये पुरविणे, ही संबंधित विभागाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची व काम घेणाऱ्या कंत्राटदाराची जबाबदारी असताना यांनी मात्र सोयीस्कररित्या सुरक्षा नियमांकडे पाठ फिरविल्याचे दिसते.

नियमांची होतेय पायमल्ली

महापालिका प्रशासनाने बनविलेले कामगार कायदे व सुरक्षा नियमावली ठेकेदारांकडून धाब्यावर बसविली जात आहे. या विरोधात अशिक्षित कामगारांनी आवाज उठविल्यास कामगारांना कामावरून कमी करण्याची भिती जास्त असते. यामुळे कामगारांना व त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे काम फक्त कागदावरच राहिल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.

या कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता ठेकेदाराचा इंजिनियर व महापालिकेचा कोणताही संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते. रस्त्याच्या अर्ध्या भागातूनच वाहतूक चालू होती परंतु वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावलेले नव्हते. डांबरीकरणाच्या कामात गुणवत्ता दिसून येत नव्हती. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. अशावेळी अपघाताची ताट शक्यता असते. कदाचित तेथे काम करणाऱ्या मजुरा सोबत सुद्धा अपघात होऊ शकतो याची जाणीव अधिकाऱ्यांना असले पाहिजे.

रस्त्यावरून भरधाव वाहणाऱ्या वाहनांच्या गर्दीत कुठलेही सुरक्षा साधनांचा वापर न करता आपल्या जीवावर उदार होऊन कामगार डांबरीकरण करतानाची वास्तव परिस्थिती आहे. लाखोची बिले उकळणारे कंत्राटदार व सुस्त महापालिका प्रशासनाला सुद्धा कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नसल्याचे ( Pimpri ) दिसते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.