Pimpri : मतदान  जनजागृतीसाठी उद्या मोटार बाईक रॅली

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 13  मे 2024  रोजी (Pimpri )मावळ व शिरुर या मतदारसंघात मतदान होत असून पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मतदान  जनजागृतीसाठी उद्या (शनिवारी) मोटार बाईक रॅली काढण्यात येणार आहे.  सकाळी 8 वाजता मोटार बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोटार बाईक रॅली ही भक्ती-शक्ती चौक,निगडी येथून सुरु करण्यातत येणार(Pimpri )असून  प्रथम निगडी प्राधिकरण, तद्दनंतर महानगरपालिकेचे अ क्षेत्रीय कार्यालय समोरुन वाल्हेकरवाडी, तेथून उजवीकडे वळून आदित्य बिर्ला हॉस्पीटल समोरून  डांगे चौक, डांगे चौकातून डावीकडे वळून जगताप डेअरी चौक, तेथून डावीकडे वळून, शिवार गार्डन समोरुन कोकणे चौकातून रहाटणी चौकात, तेथून डावीकडे वळून काळेवाडी रोडला, तेथून उजवीकडे वळून डी-मार्टचे समोरुन एम्पाएर स्क्वेअर समोरुन डावीकडे वळून, चिंचवड स्टेशन चौक, तेथून यु-टर्न घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन मुख्यालय याठिकाणी मोटार बाईक रॅलीची सांगता होणार आहे. सदर रॅलीत रॉयल इनफील्ड, होंडा प्रिमियम, कावासाकी, सुझुकी व इतर इलेक्ट्रॉनिक्स मोटारसायकल कंपनीचे वेगवेगळे प्रशिक्षित रायडर्स सहभागी होणार आहेत.

 

Loksabha Election : उरण तालुक्यातील मोठ्या यात्रांमध्ये बारणे यांची हजेरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांना आवाहन करणेत येत आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदारांनी मतदानांचा हक्क बजावावा व मतदान करण्यापासून वंचित राहू नये याकरीता महानगरपालिकेमार्फत विविध माध्यमांद्वारे मतदान जनजागृती करणेत येत असून त्याचाच एक भाग म्हणून मोटार बाईक रॅलीचे आयोजन करणेत आलेले आहे.

 

सदर मोटार बाईक रॅलीमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक बाईक रायडर्स यांना  मतदार जनजृगतीचे प्रमाणपत्र सुध्दा  देणेत येणार आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी सदर मोटार बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन मतदान जनजागृती करिता सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.