Wakad: तरुणीचा चोरुन फोटो काढून अश्लिल साईटवर केला अपलोड
युवकाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – तरुणीचा चोरुन फोटो काढून अश्लिल साईटवर अपलोड करत ”आता तु टेंशन घे बघ, मी काय करु शकतो” असा मेसेज व्हॉट्सअॅपवर करुन धमकी देणा-या युवकाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नुकताच वाकड येथे उघडकीस आला आहे.
कामील शब्बीर मोहमंद (वय 32, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कामील यांने चोरुन तरुणीचा फोटो काढला. तो फोटो अश्लिल साईटवर अपलोड केला. तसेच तरुणीच्या व्हॉट्सअॅपवर ”आता तु टेंशन घे बघ, मी काय करु शकतो” अशी धमकी दिली. तसेच आरोपी कामील याने वेळोवेळी फोन व मेसेज करुन मानसिक त्रास दिला. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप मेसेज हॅक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.