Alandi : आल्हाटवस्ती मधून कार चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्हाटवस्ती कोयाळी येथून कार चोरीला गेली. ही घटना 23 जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.

Hinjawadi : भंगार चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि. 29) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल शंकर लेंडगर, यश गणपत लेंडगर (दोघे रा. चाकण), दीपक आल्हाट (रा. कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने त्यांची चार लाख रुपये किमतीची कार (एमएच 14/जीवाय 8695) त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. 23 जुलै रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या कालावधीत आरोपींनी कार चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.