Pimpri : गावठी दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी दोन हजार लिटर गावठी दारू साठवून ठेवल्या प्रकरणी पिंपरी (Pimpri) पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 29) पहाटे भाटनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

Alandi : आल्हाटवस्ती मधून कार चोरीला

ऋषी रावळकर (वय 28, रा. काळेवाडी), मनोज बागडे (वय 45, रा. भाटनगर, पिंपरी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद कुदळे (वय 43, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भाटनगर येथे 200 लिटरच्या आठ ड्रममध्ये 1600 लिटर आणि 100 लिटरच्या चार ड्रममध्ये 400 लिटर दारू विक्रीच्या बहाण्याने साठवून ठेवली. याप्रकरणी कारवाई करून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.