Pune : डांबर असलेल्या ड्रममधे अडकलेल्या दोन श्वानांची अग्निशमन दलाकडून सुटका 

एमपीसी न्यूज –  अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात कोंढवा, पारगे नगर, डिएसके सोसायटीच्या मागे 29  जुलै 2023  रोजी (शनिवार) सकाळी ठिक 10 .12 वाजता डांबर असलेल्या ड्रममधे दोन श्वान अडकले असून त्यांची सुटका करण्याकरिता अग्निशमन दलाची मदत मागितली असता तातडीने कोंढवा खुर्द (Pune) येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

Pimpri : गावठी दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका ड्रममधे मोठ्या प्रमाणात डांबर असून त्यामधे श्वानाची दोन पिल्ले अडकली असून त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान जवांनापुढे होते. तसेच तेथील स्थानिकांनी उंच डोंगर भागावरुन टॅक्टरमधून हा ड्रम खाली आणला होता.

वाईल्ड एनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसुळ यांना संपर्क साधत त्यांचे दोन सदस्य ही त्याठिकाणी पोहोचले होते. जवानांनी शक्कल लढवत प्रथम त्या सर्क्युलर सॉ हे अग्निशमन उपकरण वापरुन ड्रमचे दोन भाग केले. नंतर अग्निशमन वाहनातील विविध छोट्या बचाव साहित्यांचा उपयोग करुन तसेच तेलाचा वापर करुन सुमारे तासाभरात हळूहळू दोन्ही श्वानांची सुखरुप सुटका केली.

 

या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील तांडेल निलेश लोणकर, वाहनचालक दिपक कचरे तसेच जवान रवि बारटक्के, सागर इंगळे, अनिकेत गोगावले, मनोज गायकवाड, संतोष माने आणि वाईल्ड एनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य लक्ष्मण वाघमारे, संदेश रसाळ यांनी सहभाग घेतला.

तसेच स्थानिक रहिवाशी प्रतिभा पवार यांनी अग्निशमन दलाकडे वेळीच माहिती देत मदत केल्याने अग्निशमन दल व प्राणी संस्था यांना श्वानाची सुटका वेळेवर करता आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.