Pune : पुण्यात मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; दलाकडून 5 जणांची सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) गंगाधाम येथे आज (शनिवारी) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास फेज 2, विंग जी -5 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागली होती. या आगीतून 5 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली.

आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द व मुख्यालयातून तीन फायर गाड्या व एक वाॅटर टँकर अशी एकूण 6 अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

सोसायटीच्या सात मजली इमारतीत सातव्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली असून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. जवानांनी तातडीने वर धाव घेत होज पाईपच्या (Pune) सहाय्याने पाण्याचा मारा सुरु करत आग विझवण्यात आली. दरम्यान बाल्कनीमध्ये कुटूंबातील एकुण पाच जण अडकून पडल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक जेष्ठ महिला, एक दांपत्य व त्यांची दोन लहान मुले असून जवानांनी या सर्वांना सुखरुप बाहेर घेत त्यांची सुखरुप सुटका केली.

Yavatmal : दहावीचा मराठी पेपर अवघ्या 10 मिनिटातच व्हायरल; यवतमाळ पाटणबोरी येथील प्रकार

सुखरूप सुटका केलेले कौटुंबिक सदस्य 

१) महेश बाबुलाल ओसवाल (वय 41  वर्ष)
२) भक्ती महेश ओसवाल – ( वय 41 वर्ष)
३) ऊषा बाबुलाल ओसवाल – ( वय 61 वर्ष)
४) आहना महेश ओसवाल – ( वय 09 वर्ष)
५) आरव महेश ओसवाल – ( वय 05 वर्ष)

सुमारे तीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण सदनिकेत पुढील खोलीमध्ये असणाऱ्या पेटत्या दिव्यामुळे लागली असा प्राथमिक अंदाज असून सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची मदत वेळेवर पोहोचल्याने जवानांनी आग इतरत्र पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. या इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंत्रणा या घटनेवेळी कार्यान्वित नसल्याचे यावेळी निदर्शनास आले.

या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस जवानांनी सहभाग घेत पाच जणांचे जीव वाचविण्यात यश मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.