Alandi : वाढदिवसाचे औचित्य साधून ओळख श्री ज्ञानेश्वरीची – एक परिवार या उपक्रमासाठी पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषदेचे (Alandi) माजी नगराध्यक्ष व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांचा 81 वा अभिष्टचिंतन सोहळा श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुरेश वडगांवकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सुरेश वडगांवकर यांचा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरेश वडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश वडगांवकर यांना सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने एक खुर्ची सप्रेम भेट दिली.

सुरेश वडगांवकर यांना शुभेच्छा देताना संस्थेचे खजिनदार दीपक पाटील यांनी काकांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्री श्वेतांबर स्थानक जैन संघाचे सचिव रमेश नवलाखा, उद्योजक मोहनशेठ चोपडा, इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गवारी, मदन बोरुंदिया, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्रशालेतील सूर्यकांत खुडे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रय वंजारी आदींनी सुरेश वडगांवकर यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि अनेक आठवणींना उजाळा दिला.

Pune : पुण्यात मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; दलाकडून 5 जणांची सुटका

वाढदिवसाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व वडगांवकर कुटुंबीय यांच्या वतीने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची – एक परिवार” या उपक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीला (Alandi) पाच लक्ष रुपयांची देणगी देण्यात आली. या देणगी मध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून तीन लक्ष तर वडगांवकर कुटुंबीयाकडून दोन लक्ष असे मिळून पाच लक्ष ओळख श्री ज्ञानेश्वरीची – एक परिवार” या उपक्रमासाठी देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी सतीश चोरडिया, सागर बागमार, राजूशेठ चोपडा, बोरा सर, विश्वंभर पाटील, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप बाफना, नंदकुमार वडगांवकर, जवाहरलाल कटारिया, अनिल वडगांवकर, डॉ. साळुंखे, प्रसिद्ध बैलगाडामालक केतन गायकवाड, सुमतीलाल लोढा, आंनद वडगांवकर, अनिल बोडके आदी मान्यवर सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

संस्थेचे सचिव श्री अजित वडगांवकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल व सुरेश वडगांवकर यांच्यावरील व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. सुरेश वडगांवकर यांच्यावर असेच प्रेम राहू देत अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन योगेश मठपती व आभार अजित वडगावकर यांनी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभरामध्ये अनेक मान्यवरांनी समक्ष, फोन द्वारे ,समाज माध्यमाच्या द्वारे सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.