Kondhwa : गॅरेजमधील 17 चारचाकी महागड्या वाहनांना आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

एमपीसी न्यूज : आज 15 मार्च रोजी पहाटे 3.20 वाजता बिबवेवाडी, आई माता मंदिराजवळ (Kondhwa) मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची घटना घडली. घटनेची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि दोन वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागली आहे. जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री करत चारही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पूर्ण विझवली.

West Bengal : ममता बॅनर्जी यांचा अपघात की कटकारस्थान? मागून धक्का दिल्याचा डॉक्टरांचा खुलासा

आगीमध्ये गॅरेजमधील एकूण 17 चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आल्या असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे. यामध्ये जखमी वा जिवितहानी झाली नाही.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.