Kondhwa : विहीरीमध्ये अडकलेल्या इसमाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – कोंढवा परिसरातील पिसोळी रस्त्यालगत ( Kondhwa) मंगळवारी (दि.26) एक तरुण विहिरीत अडकला होता. ज्याची अग्निशमनदलातर्फे सुखरुप सुटका कऱण्यात आली आहे.

Pune : धुळवडीला पुणे वाहतूक पोलिसांकडून ड्रींक ड्राईव्ह प्रकरणी 142 जणांवर कारवाई

माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथून तातडीने अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी अंदाजे 20 ते 25 फुट खोल विहीरीमध्ये एक इसम अडकला असून सुटकेसाठी प्रयत्न करीत आहे असे समजले. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर इसमाशी संवाद साधून त्याला धीर देत विहीरीमध्ये प्रवेश केला.

जवान विहीरीत उतरताच सदर इसम तेथील पाण्यामधून बाहेर येऊन तो इसम कडेला उभा होता.  त्याला सेफ्टी बेल्ट लावून दोरीचा वापर करत विहीरीच्या बाहेर कोणतीही इजा होऊ न देता सुखरुप घेण्यात जवानांनी सुमारे तीस मिनिटात यश मिळवले. सदर इसमास विहीरी बाहेर काढले. यावेळी उपस्थित पोलीस व नागरिकांनीही अगिनिशमनदलाला मदत केली.

ही कारवाई कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहन चालक समीर तडवी व जवान दशरथ माळवदकर, प्रकाश शेलार, विकास वाघ, पंकज ओव्हाळ यांनी ( Kondhwa) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.