Pune : धुळवडीला पुणे वाहतूक पोलिसांकडून ड्रींक ड्राईव्ह प्रकरणी 142 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – धुळवडीला पुणे वाहतूक पोलिसांनी ( Pune) सोमवारी (दि.25) ड्रींक अन्ड ड्राईव्ह प्रकरणी 142 जणांवर कारवाई केली आहे. तर नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

Maharashtra : यंदा दहावी-बारावीच्या परिक्षेत गैरप्रकारांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत घट

नाकाबंदीत ब्रीथ ॲनलायजर यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत 142 वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. तसेच एकाच दुचाकीचा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी (ट्रिपल सीट) वापर केल्याप्रकरणी 226 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, बेशिस्तपणे वाहन लावणे, मोठ्याने हाॅर्न वाजविणे, सिग्नल तोडणाऱ्या 933 वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ( Pune) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.