LokSabha Elections 2024 : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; सात उमेदवार जाहीर

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वबळावर ( LokSabha Elections 2024) लढविणार असल्याचे  आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Kondhwa : विहीरीमध्ये अडकलेल्या इसमाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धक्का बसला ( LokSabha Elections 2024) आहे.

 वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी!

भंडारा गोंदिया- संजय केवत

गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी

चंद्रपूर – राजेश बेल्ले

बुलढाणा- वसंत मगर

अकोला- प्रकाश आंबेडकर

अमरावती- कुमारी प्राजक्ता पिल्लेवान

वर्धा- राजेंद्र साळुंके

यवतमाळ वाशिम- खेमसिंग पवार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.