Chinchwad : थेरगावच्या रोहित कोतकर यांची एमपीएससीमधून सहायक राज्यकर आयुक्त पदी निवड

एमपीसी न्यूज – थेरगाव मधील आनंदवन सोसायटी येथे राहणारे रोहित बाळासाहेब कोतकर (Chinchwad) यांची एमपीएससी मधून सहायक राज्यकर आयुक्तपदी (जीएसटी विभाग, वर्ग -1) पदी निवड झाली आहे. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी एमपीएससी परीक्षा देत प्रशासकीय क्षेत्रात यश मिळवले. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

 

रोहित कोतकर यांचे ताथवडे डेअरी फार्म येथे बालपण गेले. वडील अन्नसुरक्षा अधिकारी पदी कार्यरत असल्याने लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेकडे करियर म्हणून ते आकर्षित झाले होते. प्रशासकीय सेवेचे बाळकडू घरापासूनच अनुभवत असल्याने आपणही प्रशासकीय अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवावा अशी जिद्द मनाशी बाळगून रोहित बाळासाहेब कोतकर यांचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला.

LokSabha Elections 2024 : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; सात उमेदवार जाहीर

रोहित यांनी शालेय शिक्षण वाकड येथील गुड सॅमारीटन स्कूल मधून घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटिल कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. हिंजवडी येथील बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये त्यांचे प्लेसमेंट झाले. आयटी कंपनीमध्ये मोठ्या पगाराची त्यांना नोकरी मिळाली. तसेच परदेशातील उच्च शिक्षणाची संधी असताना देखील मूळ प्रशासकीय सेवेची आवड ही त्यांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे रोहित यांनी खाजगी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली.

यूपीएससीच्या मुख्य परीक्षा देखील दिल्या. सोबत एमपीएससीच्या परीक्षा सुद्धा देत होते. परंतु यशाचा रस्ता थोडासा खडतर होता. अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्द, मेहनत, संयम, चिकाटी यांच्या जोरावर तयारी सुरु ठेवली. त्याचे फळ त्यांना मिळाले असून राज्यसेवा परीक्षेतून त्यांची जीएसटी विभागात सहाय्यक आयुक्त राज्यकर गट-अ पदी त्यांची निवड (Chinchwad) झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.