Bhosari : सिंथेटिक ट्रॅक उखडला, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल पुन्हा बंद

एमपीसी न्यूज – भोसरी इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक ( Bhosari ) अवघ्या आठवड्याभरात उखडला आहे.   या कामावर चार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. सिंथेटिक ट्रॅक उखडल्याने संकुल पुन्हा स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामासाठी बंद केला आहे.

भोसरीतील इंद्रायणीनगर मध्ये पूर्वी बसविण्यात आलेला सिंथेटिक ट्रॅक नादुरुस्त झाल्याने नव्याने सिंथेटिक ट्रॅक  उभारण्याचे काम गेल्या वर्षी हाती घेतले होते. अतिशय संथ गतीने सुरू झालेले काम यावर्षी मार्च महिन्यात संपून हा ट्रॅक  खेळांडूसाठी खुला करण्यात आला होता. ट्रॅकवर खेळाडू सराव करत असताना अवघ्या पाचच दिवसांत हा ट्रॅक उखडण्यास सुरूवात झाल्याने खेळाडूंमध्ये निराशा पसरली आहे. साधे बूट घालून ट्रॅकवर सराव करत असतानादेखील हा ट्रॅक उखडत आहे. धावण्याच्या शर्यतीतील स्पाइक बूटाला तळाकडच्या बाजूला खिळे असतात.

Chinchwad : थेरगावच्या रोहित कोतकर यांची एमपीएससीमधून सहायक राज्यकर आयुक्त पदी निवड

अशा प्रकारचा बूट घालून या ट्रॅकवर सराव केल्यास हा ट्रॅक टिकणारच नसल्याचे काही खेळाडूंनी सांगितले. त्यामुळे, या ट्रॅकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील लॉन्स, टेनिस कोर्टच्या नूतनीकरणासह ट्रॅक उभारण्यावर महापालिकेने तब्बल चार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, ट्रॅक सुरू झाल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांनी हा ट्रॅक उखडल्याने महापालिकेचा खर्च वाया जाण्याची भीती काही नागरिकांनी व्यक्त केली. सिंथेटिक ट्रॅक उखडल्याने स्थापत्यविषयक कामासाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल बंद ठेवण्यात आले आहे.

सह शहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले की, ठेकेदाराला अद्याप पूर्ण मोबदला देण्यात आलेला नाही. ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल. आवश्यकता वाटल्यास  ट्रॅक विषयी त्रयस्थ व्यक्ती अथवा संस्थेद्वारे पाहणी करून माहिती मिळविण्यात ( Bhosari ) येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.